एमपीएससी वैधमापन निरीक्षक परीक्षेत दर्जी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे यश
दर्जी रोजगार संदेश 25 सप्टेंबर 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या वैधमापन निरीक्षक गट ब परीक्षेत दर्जी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एमपीएससी वैधमापन निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात दर्जी फाउंडेशनचे दोन विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. यात सायली दिलीप कांबळे व देवराम दशरथ रायकर या विद्यार्थ्यांनी यशस्वी बाजी मारली आहे.
यूपीएससी परीक्षेसह एमपीएससी राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेच्या अंतिम निकालात दर्जी फाउंडेशनचे विद्यार्थी सातत्याने यशस्वी होत आहेत. एवढेच नव्हे तर मागील तीन वर्षात सातत्याने दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गट अ व ब पदी यशस्वी होत आहेत. यामुळे केवळ खांदेशातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम निकाल देणारी संस्था म्हणजेच दर्जी फाउंडेशन असे मानले जात आहे. प्रत्येक परीक्षांमध्ये विदयार्थ्यांनी मिळविलेले हे मनाला आणि मार्गदर्शासाठी नवी उभारी देते असे मत प्रा. गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा. गोपाल दर्जी, सौ. ज्योती दर्जी व शिक्षकांनी अभिनंदन केले.