दर्जी फाउंडेशनच्या साहील सोनवणेची सैन्यदलात निवड
दर्जी रोजगार संदेश – 24 सप्टेंबर 2024 स्पर्धा परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रात अव्वल असलेल्या दर्जी फाउंडेशनच्या साहील धनराज सोनवणेची भारतीय सैन्यदलात यशस्वी निवड झाली आहे. सैन्यदलात अग्निवीर पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी व लेखी चाचणीचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या अंतिम निकालात दर्जी फाउंडेशनच्या साहील सोनवणेने यशस्वी बाजी मारली आहे. धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील शेतकरी कुटुंबातील साहीलची निवड ही अभिमानास्पद आहे. शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या यशासाठी दर्जी फाउंडेशन हे एक हक्काचे व्यासपीठ झाले आहे. कारण येथे मार्गदर्शन घेत असलेल्या विद्यार्थ्यांची निवड व्हावी यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातात. म्हणून यूपीएससी परीक्षा असो किंवा एमपीएससी यात देखील दर्जी फाउंडेशनचे विद्यार्थी उल्लेखनीय बाजी मारत आहेत. परंतु सैन्यदलात विद्यार्थ्यांची निवड देखील तेवढीच आनंदायी आहे. असे मत प्रा. गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. सध्या १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर युवकांसाठी रेल्वे भरतीचे फॉर्म भरणे सुरु आहे. यासाठी दर्जी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅचेस सुरु करण्यात आल्या असून हमखास यशासाठी या बॅचेसचा लाभ घ्यावा असे आवाहन आपल्या प्रास्ताविकात सौ ज्योती दर्जी यांनी केले.