दर्जी रोजगार संदेश २ ऑक्टोबर २०२४ :- दर्जी फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अव्वल असलेल्या जळगांव येथील दर्जी फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. या महापुरुषांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण प्रा. गोपाल दर्जी व संचालिका सौ. ज्योती दर्जी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी दोघे महापुरूषांची कार्यप्रणाली किती महत्वाची आहे. याबाबत मार्गदर्शन करतांना गोपाल दर्जी म्हणाले की, महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्यांच्या विचारांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. बापूंचे विचार आम्हाला भारताला समृध्द आणि करूणामय भारत निर्माण करण्याच्या दिशेने सतत मार्गदर्शन करत असतात. तसेच लालबहादूर शास्त्री हे विनयशील आणि कणखर होते. त्यांनी नेहमीच साधेपणा जपला आणि देशाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वाहिले. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आठवून आम्ही त्यांना त्यांच्या जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, त्यांचे काहीतरी गुण आपण आपल्या जीवनात स्विकारले तर काहीतरी सार्थक होईल. असे मत प्रा. गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले.
Show less