MARATHI BLOGबायोग्राफीमाहितीपूर्ण

प्रणव सूरमा माहिती मराठी : Pranav Soorma Para Athlete information in Marathi 2024

 पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारे प्रणव सूरमा यांच्या यशापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. प्रणव सूरमा पॅरा ऍथलीट (Pranav Soorma Para Athlete) आहेत. ते F51 कॅटेगरीत क्लब थ्रो क्रीडा प्रकार खेळतात. हा क्रीडा प्रकार फक्त पॅरा ॲथलीट साठी असून इतरांसाठी उपलब्ध नाही. आपल्या अपंगत्वावर मात करून प्रणव सूरमा यांनी मिळवलेले यश हे अद्वितीय आहे. त्यांचा हा प्रवास हा आपणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे म्हणूनच

प्रारंभिक जीवन

प्रणव सूरमा यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1994 मध्ये झाला. त्यांचे मूळ गाव हरियाणा राज्यातील फरीदाबाद हे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव संजीव सूरमा आहे. संजीव यांनी आपल्या मुलाला खेळात यशस्वी होण्यासाठी मदत करण्यासाठी आपली नोकरी सोडली आणि प्रणव यांचे परिचर म्हणून भूमिका पार पाडली. कारण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पूर्णवेळ परिचर ठेवणे हे सूरमा यांना परवडत नव्हते. वडिलांनी नोकरी सोडल्यानंतर घराची जबाबदारी प्रणव यांच्या आईने सांभाळली. एकंदरीत प्रणव यांना खेळात मदत करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या कुटुंबाच्या त्यागाचे फलित माझे यश असल्याचे प्रणव सुरमा आपल्या मुलाखतीत सांगतात. (Pranav Soorma Para Athlete)

शिक्षण

प्रणव सूरमा हे लहानपणापासून हुशार होते. आणि त्यांनी तसे करूनही दाखवले. त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली येथील सेंट पॉल स्कूल मध्ये झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी भारतातील नामवंत दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून मिळवली आणि बँकिंग क्षेत्रात करिअरला सुरुवात केली. सध्या प्रणव सूरमा हे सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) म्हणून बँक ऑफ बडोदा या बँकेत कार्यरत आहेत. बँकिंग क्षेत्रात कार्य करत असतानाच काहीतरी वेगळे करायचे निर्णयाने ते क्रीडा क्षेत्राकडे वळले आणि येणाऱ्या काळात बँकर असणारे प्रणव सूरमा ते पॅरा ऍथलीट म्हणून उदयास आले.

अपंगत्व

काही गोष्टी आपल्या हातात नसतात. . त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांना कायमस्वरूपी चे अपंगत्व आले आणि इथून पुढचे संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर घालवणे त्यांना भाग पडले. पण यातून हार न मानता किंवा नैराश्यात न जाता प्रणव सूरमा यांनी अपंगत्वावर मात करून स्वतःची नवीन ओळख तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या अपंगत्वाला दोष न देता त्याला वरदान मानण्यास सुरुवात केली. (Pranav Soorma Para Athlete)

क्रीडा क्षेत्रात पदार्पण

आपल्या अपंगत्वाकडे सकारात्मक दृष्टीने बघून आयुष्यात नवी उभारी घेण्यासाठी तसेच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खेळाकडे वळण्याचा निर्णयप्रणव सूरमा यांनी घेतला. ते आपल्या अपंगत्वाकडे एक वरदान म्हणून बघतात. त्यांची 2016 मध्ये पॅरा स्पोर्ट्स सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांनी  पॅरा स्पोर्ट्सची बरीच माहिती मिळवली. त्यांना सुरुवातीला पॅरा स्विमिंग करायचे होते. पण त्यासाठी त्यांची शारीरिक स्थिती योग्य नव्हती. पण यातही त्यांना चांगला प्रशिक्षक मिळाला नाही. त्याचवेळी प्रणव यांची ओळख पॅरा स्पोर्ट्सप्रशिक्षक नरसीराम यांच्याशी झाले.

नरसी राम सरांच्या सल्ल्यानुसार प्रणव यांनी क्लब थ्रो क्रीडा प्रकारात भाग घेण्याचे ठरवले. यामध्ये हात आणि खांद्याचा वापर केला जातो. क्लब थ्रो हे हॅमर थ्रो प्रमाणेच पॅरा ऍथलीटसाठी असणारा क्रीडा प्रकार आहे. प्रणव यांच्या शारीरिक स्थितीनुसार त्यांना F51 या प्रकारात खेळण्यास संधी मिळाली. आणि या संधीचे त्यांनी येणाऱ्या काळात सोने करून दाखविले. (Pranav Soorma Para Athlete)

कारकीर्द

बँकर असणाऱ्या प्रणव सूरमा यांनी क्लब थ्रो क्रीडा प्रकारात आपल्या क्रीडा क्षेत्रातील करियरला सुरुवात केली. 2018 मध्ये प्रणव सूरमा यांनी क्लब थ्रो चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. प्रचंड मेहनत घेऊन आपल्या पदार्पणातच 2019 मध्ये बीजिंग येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स स्पर्धेत प्रणव सुरमा यांनी रोप्य पदक मिळविले. त्यानंतर 2022 मध्ये ट्यूनिशिया येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. अशी पदके मिळवत प्रणव सुरमा यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या आशियाई  करून आशियाई रेकॉर्ड तयार केला आणि आशियाई चॅम्पियन झाले. तसेच डिसेंबर 2023 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. यावेळी त्यांनी आशियाई पॅरा स्पर्धेतील स्वतःचेच रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड तयार केला.

 

अशाप्रकारे व्हीलचेयरवर बसून यशाच्या शिखरावर जाता येते हे त्यांनी सिद्ध केले. यशस्वी लोकांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर हे स्पष्ट जाणवते की त्यांच्या आयुष्यात कोणत्याही नकारात्मक गोष्टीला स्थान नसते. प्रत्येक गोष्टीकडे ते सकारात्मक दृष्टीने बघतात आणि त्यातून चांगले घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच एखाद्या कार्याप्रती असलेली जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत आपल्याला दिसते. या गुणांच्या जोरावरच आयुष्यात यशापर्यंत ही यशस्वी लोक पोहचतात. अशाच पद्धतीने प्रणव सूरमा देखील झालेल्या अपघाताने खचून न जाता सकारात्मक दृष्टी ठेवून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले. आयुष्यात एक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झालेला प्रवास त्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून यशस्वीपणे पूर्ण केला.

यशस्वी व्यक्तीबाबत जाणून घेण्यासाठी आवडेल हे तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तुमच्या मागणीनुसार pocketbiography.com ची टीम त्यावर नक्की काम करेल आणि अशीच प्रेरणादायी चरित्रे वाचकांपर्यंत पोहोचवेल. तुमचे असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1- प्रणव सूरमा कोणता खेळ खेळतात?

उत्तर – प्रणव सूरमा क्लब थ्रो (Club Throw) हा खेळ खेळतात.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button