यशासाठी कुशल मार्गदर्शकाची नितांत गरज- प्रा. गोपाल दर्जी यांचे नूतन मराठा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश हवे असल्यास कुशल मार्गदर्शकाची नितांत गरज आहे असे मत प्रा. गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. नूतन मराठा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना या विषयावर नूतन मराठा शिक्षणशास्त्र महाविद्यालय तर्फे तीन दिवशीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात पहिले पुष्प गुंफतांना प्रा. गोपाल दर्जी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणानुसार कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा देता येतात याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
जीवनात स्थैर्य हवे असल्यास शासकीय नोकरी आवश्यक आहे आणि कोणतीही शासकीय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. परंतू दडपण न घेता या परीक्षांना सामोरे जा. मात्र यात हमखास यश असल्यास कुशल मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. या तज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमातूनच हमखास यश मिळू शकते असे प्रतिपादन प्रा. गोपाल दर्जी यांनी केले. या कार्यक्रमावेळी नूतन मराठा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन मराठा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेतील पहिल्या पुष्पमालेचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रा. गोपाल दर्जी व पदाधिकारी