MARATHI BLOGबायोग्राफीमाहितीपूर्ण

शिवपुत्री, स्वराज्यरक्षक: महाराणी ताराबाई भोसले

मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई यांचे नाव अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि राजाराम राजांच्या पत्नी म्हणून त्यांची ओळख असली, तरी त्यांचं योगदान फक्त राजघराण्यापुरतं मर्यादित नव्हतं. मुघलांशी झुंजण्यासाठी त्यांनी स्वतः युद्धाची धुरा वाहिली आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचं नेतृत्व, शौर्य आणि धैर्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.

महाराणी ताराबाई भोसले यांचा जन्म आणि बालपण

ताराबाईंचा जन्म इ.स. 1675 मध्ये तोरणा येथे झाला. त्यांचे मूळ नाव ‘तारा’ होते. त्यांचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. ताराबाई लहानपणापासूनच हुशार आणि धाडसी होत्या. त्यांना लष्करी प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्यांनी तलवारबाजी, तिरंदाजी, घोडेस्वारी आणि इतर लष्करी कौशल्ये शिकली. तसेच त्यांना राजकारण, राज्यशास्त्र आणि नीतिशास्त्राचे शिक्षणही देण्यात आले. ताराबाईंवर त्यांच्या वडिलांचा मोठा प्रभाव होता. हंबीरराव मोहिते हे एक कुशल सरसेनापती आणि दूरदर्शी राजकारणी होते. त्यांनी ताराबाईंना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्शही ताराबाईंवर प्रभाव टाकणारे होते.

महाराणी ताराबाई यांचा विवाह 

1682 मध्ये आठ वर्षांची असताना ताराबाईंचं लग्न (मराठा विवाह) राजाराम राजांशी झालं. ताराबाई राजाराम राजांच्या दुसऱ्या पत्नी असल्या तरी त्यांच्या कार्यात महाराणींचा मोलाचा वाटा होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी राजाराम राजे प्रयत्न करत होते.

Maharani Tarabai Information in Marathiमहाराणी ताराबाई, मराठ्यांच्या साम्राज्याची रणरागिणी

25 मार्च 1689 हा मराठा इतिहासातील एक दुःखद दिवस. याच दिवशी मुघलांनी रायगडावर वेढा घातला आणि छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. या कठीण परिस्थितीत महाराणी ताराबाईंनी धाडसी भूमिका बजावली आणि मराठा साम्राज्याचा ध्वज उंचावून धरला. त्यांनी मराठा सैन्याला प्रेरणा दिली आणि स्वराज्याचा लढा सुरू ठेवण्याचा आग्रह केला.

छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई या विशाळगडावर राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लष्करी आणि मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. 1694 साली या तिघी जिंजीला पोहोचल्या आणि 9 जून 1696 रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी द्वितीय हा पुत्र झाला. (Maharani Tarabai Information in Marathi)

राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराबाईंनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. त्यांनी मुघल फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आणि मराठा साम्राज्यातील सरदारांना एकत्रित ठेवून शत्रूचा पराभव केला. स्वतः लष्करासमोर येऊन त्यांनी सैनिकांचा आत्मविश्वास वाढवला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मुघली मुलुखांवर स्वारी करून चौथाई आणि सरदेशमुखी (ताराबाईंनी मोगल प्रदेशावर हल्ले केले आणि त्यांच्याकडून कर वसूल केले.) गोळा करून आर्थिक बळ मजबूत केले.

ताराबाईंनी करवीर राज्याची, म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी आणि धनाजी यांना सोबत घेऊन त्यांनी मुघलांना पराभवाचा सामना करायला भाग पाडले. महाराणी ताराबाई या एक कुशल प्रशासक, दूरदर्शी नेता आणि रणरागिणी होत्या. त्यांनी मराठा साम्राज्याचा कारभार हाताळून त्याला टिकवून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचे कार्य मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. (Maharani Tarabai Information in Marathi)

जेव्हा ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याला तोंड देत होत्या तेव्हा त्यांचे वय फक्त २४ ते २५ वर्षे होते. त्यांनी औरंगजेबासारख्या हुशार, क्रूर आणि कपटी सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला.

ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यातील संघर्ष थोडक्यात

1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर

  • शाहू महाराज हेच वारसदार होते, परंतु ते लहान आणि मुघलांच्या कैदेत होते.
  • ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी द्वितीय यांना गादीवर बसवले आणि कारभार पाहू लागल्या.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर

  • मुघलांनी शाहू महाराजांची सुटका केली, ज्यामुळे महाराष्ट्रात दुही निर्माण झाली.
  • अनेकांना शाहू हेच उत्तराधिकारी वाटत होते, त्यामुळे वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला.

संघर्ष

  • खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे ताराबाईंचे समर्थक शाहूंच्या बाजूला गेले.
  • शाहूंनी ताराबाई आणि शिवाजी द्वितीय यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1707 मध्ये खेड येथे झालेल्या लढाईत शाहूंचा विजय झाला.
  • ताराबाईंनी जिंकलेले किल्ले शाहू महाराजांना मिळाले. (Maharani Tarabai Information in Marathi)
  • बाळाजी विश्वनाथ यांनी ताराबाईंच्या पक्षातील सेनानींना शाहू महाराजांच्या बाजूला वळवून घेतले.

परिणाम

  • शाहूं महाराजांनी साताऱ्याला गादी स्थापन केली.
  • ताराबाईंनी कोल्हापूरला वेगळी गादी स्थापन केली.
  • 1714 मध्ये राजसाबाईंनी ताराबाईंना पदच्युत करून संभाजी द्वितीय यांना गादीवर बसवले.
  • ताराबाई आणि शिवाजी द्वितीय यांना कैद करण्यात आले.
  • शिवाजी द्वितीय 1726 मध्ये मरण पावले. (Maharani Tarabai Information in Marathi)
  • 1730 मध्ये, ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यातील वाद मिटले आणि महाराणी ताराबाई  साताऱ्यात निवासाला गेल्या.

1700 ते 1730 पर्यंत चाललेला संघर्ष मराठा साम्राज्यासाठी कठीण काळ होता. या संघर्षामुळे साम्राज्याची शक्ती कमकुवत झाली. अनेक पराक्रमी सेनापती आणि सरदार या संघर्षात शहीद झाले. या संघर्षात बाळाजी विश्वनाथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कुशल नेतृत्व आणि राजकीय कौशल्याने साम्राज्याला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुघल आणि इतर शत्रूंशी संघर्ष करत साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. (maharani tarabai information in marathi)

स्त्रीशक्तीचे प्रतीक

त्या काळात स्त्री राजकारणात उतरत नसल्याने ताराबाईंचे काम फार मोठे होते. त्यांनी पुरुषांच्या बरोबर युद्धात भाग घेतला, सैन्याचे नेतृत्व केले, त्यांच्या निर्णयांवर सर्वांनी विश्वास ठेवला. त्यांच्यामुळे मराठ्यांचा मनोबळ वाढला आणि मुगलांना धोबीपटका देण्यात यश मिळाला.

कारकिर्दीचा शेवटचा भाग

1740 च्या दशकात ताराबाईंनी शाहू महाराजांना राजाराम द्वितीय नावाचा मुलगा असल्याचा दावा केला. शाहू महाराजांना मुलगा नसल्यामुळे त्यांनी राजाराम द्वितीयचा राज्याभिषेक केला. ताराबाई आणि पेशवा बालाजी बाजीराव यांच्यात वाद झाला आणि ताराबाईंनी राजाराम द्वितीयला कारागृहात टाकले. बालाजी बाजीरावाने ताराबाईंना पराभूत करून राजाराम द्वितीयची सुटका केली. शेवटी ताराबाईंनी बालाजी बाजीरावासोबत तह केला आणि शेवटचे दिवस साताऱ्यात घालवले. (Maharani Tarabai Information in Marathi)

शेवटचा श्वास

1761 मध्ये 86 वर्षांच्या वयात ताराबाईंचे निधन झाले. पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यां स्वातंत्र्यासाठी झगडत राहिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुगलांच्या विरोधात जवळपास 27 वर्षे लढाई दिली. त्यामुळे मराठ्यांचे साम्राज्य जिवंत राहिले आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना ताराबाईंनी बळ दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button