जळगांव

श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातर्फे फार्मासिस्ट दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

Pharmacist Day: जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातर्फे जळगाव शहरात नुकतेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या रॅलीत जवळपास २५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.


जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून निघालेल्या रॅलीची छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये विविध प्रकारचे बॅनर व पोस्टर्सच्या माध्यमातून संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांची जनजागृती केली. फार्मासिस्ट औषधांमध्ये तज्ज्ञ नसतात तर ते एक आरोग्य सेवेचा आधारस्तंभ असतात. रुग्णांना ते औषधांबद्दल व आरोग्याबद्दल जागृत करत असतात. समाजातील आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यात फार्मासिस्टचा मोठा वाटा असतो. औषधांचा डोस व त्यांचा योग्य वापर, संभाव्य दुष्परिणामांची माहिती फार्मासिस्ट वेळोवेळी देत असतात, अशी माहिती रॅलीत सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जनजागृती रॅली दरम्यान दिली. संस्थेचे प्राचार्य डॉ.योगेश पवार, डॉ.किरण पाटील, प्रा.अतुल पाटील, प्रा.सोनार सर, प्रा. राहुल सर व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही रॅलीत सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button