श्री महालक्ष्मी मित्र मंडळ महाजन नगर तर्फे दुर्गा सप्तशती पाठ वाचन
श्री महालक्ष्मी मित्र मंडळ महाजन नगर तर्फे दुर्गा सप्तशती पाठ वाचन
मेहरुण मधील रामेश्वर कॉलनी परिसरात संस्कृती टिकवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी श्री महालक्ष्मी मित्र मंडळा तर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे . त्याचाच एक भाग म्हणून भक्तिमय वातावरणात शारदा नवरात्रोत्सवा निमित्त श्री सूक्त सामूहिक पाठवाचन करण्यात आले. दु. 4 .00 वाजता रामेश्वर कॉलनीतील 100 महिलांद्वारे देवीच्या भजनाचा व सामूहिक श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.सौ. सुनिता वाणी ताई यांच्या सुमधुर आवाजातून पाठ वाचण करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजक मुकेश भाऊ नाईक, अतुल भाऊ महाजन, अल्पेश भाऊ देवरे व अध्यक्ष सागर देवरे उपाध्यक्ष यश राजपूत, सुयोग नेहते मंडळातील सर्व कार्यकर्ते यांनी सर्वांच्या आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील महिला- पुरुष यांचे सहकार्य लाभले.