सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.. तसेच 10 वाजून 59 मिनिटांनी 2 मिनिटे स्तब्ध मौन उभे राहून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजाराम’ व ‘ वैष्णव जन तो तेंनी काहिये जे’ ही दोन भजने गायली गेली त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांची महात्मा गांधीजी यांच्या कार्यावर भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी प्रसंगी त्यांचे योगदान व जीवन कार्याविषयीची माहिती सांगितली. शितल कोळी मॅडम यांनी महात्मा गांधींजीचे विचार जीवनात मार्गदर्शक असल्याचे मत मांडले. रूपाली आव्हाड मॅडम यांनी प्रास्ताविक तर आभार श्रीमती सुवर्णा अंभोरे मॅडम यांनी मांडले. उपशिक्षिका कविता सानप मॅडम यांनी सर्वांना सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली . कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.
Related Articles
Check Also
Close