जागतिक दिन :
- जागतिक बॉलिवूड दिन
24 सप्टेंबर दिनविशेष – घटना :
- 1664 : नेदरलँड्सने न्यू ॲमस्टरडॅम इंग्लंडला दिले.
- 1873 : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- 1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी वायोमिंगमधील डेव्हिल्स टॉवर हे देशाचे पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- 1932 : पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बी.एस्सी. मुकुंदराव जयकर आदींच्या स्वाक्षऱ्या.
- 1946 : हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
- 1948 : होंडा मोटार कंपनीची स्थापना.
- 1950 : पूर्व युनायटेड स्टेट्स पश्चिम कॅनडातील चिंचगा आगीमुळे दाट धुक्याने झाकले गेले.
- 1954: AEC रूटमास्टर, लंडनची प्रतिष्ठित बस सादर करण्यात आली
- 1960 : अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
- 1973 : गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- 1995 : मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
- 1996 : 71 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी केली.
- 1999 : कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
- 2007 : कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-20 विश्वकप जिंकला
- 2008 : थाबो म्बेकी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- 2009 : G20 शिखर परिषद पिट्सबर्गमध्ये 30 जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाली.
- 2014 : मार्स ऑर्बिटर मिशनने भारताला मंगळाच्या कक्षेत पोहोचणारे पहिले आशियाई राष्ट्र बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र बनले.
- 2015 : मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत 717 लोक ठार.
- 2023 : नासाचे OSIRIS-REx कॅप्सूल ज्यामध्ये लघुग्रह 101955 बेन्नूचे नमुने आहेत ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आले.
- वरीलप्रमाणे 24 सप्टेंबर दिनविशेष 24 september dinvishesh
24 सप्टेंबर दिनविशेष – जन्म :
- 1534 : ‘गुरू राम दास’ – शिखांचे 4 थे गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 1581)
- 1551 : ‘दासो दिगंबर देशपांडे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1616)
- 1861 : ‘मॅडम भिकाजी रुस्तुम कामा’ – भारतीय क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1936)
- 1870 : ‘जॉर्जेस क्लॉड’ – नीऑन लाईट चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मे 1960)
- 1889 : ‘केशवराव त्र्यंबक दाते’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1971)
- 1898 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1960)
- 1902 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरु आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1989)
- 1911 : ‘कॉन्स्टंटिन चेरेनेन्को’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च 1985)
- 1915 : ‘प्रभाकर शंकर मुजूमदार’ – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत यांचा जन्म.
- 1921 : ‘डॉ. सखाराम गंगाधर मालशे’ – लेखक, समीक्षक व संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 1992)
- 1922 : ‘गजानन वासुदेव बेहेरे’ – सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1989)
- 1924 : ‘गुरू चरणसिंग तोहरा’ – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 2004)
- 1925 : ‘ऑटो सिंग पेंटल’ – भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 2004)
- 1936 : ‘शिवती आदितन’ – भारतीय उद्योजिक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 2013)
- 1940 : ‘आरती साहा’ – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1994)
- 1950 : ‘मोहिंदर अमरनाथ’ – क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 24 सप्टेंबर दिनविशेष 24 september dinvishesh
24 सप्टेंबर दिनविशेष – मृत्यू :
- 1896 : ‘लुईस गेरहार्ड डी गेर’ – स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1818)
- 1939 : ‘कार्ल लामेल्स्’ – युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 जानेवारी 1867)
- 1998 : ‘वासुदेव पाळंदे’ – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक यांचे निधन.
- 2002 : ‘श्रीपाद जोशी’ – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक यांचे निधन.
24 सप्टेंबर दिनविशेष – जागतिक दिन लेख :
जागतिक बॉलिवूड दिन
जागतिक बॉलिवूड दिन हा चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. बॉलिवूड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रमुख भाग आहे आणि जगभरात त्याचे मोठे प्रेक्षक आहेत. बॉलिवूडचे चित्रपट संगीत, नृत्य, आणि नाट्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.
मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीने 100 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या प्रवासात अनेक कालातीत चित्रपट दिले आहेत. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडला एक जागतिक ओळख दिली आहे.
जागतिक बॉलिवूड दिनाच्या निमित्ताने, या उद्योगाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी दिलेल्या योगदानाची आठवण केली जाते. भारतीय परंपरा, संस्कृती, आणि आधुनिकतेचं संमिश्र रूप बॉलिवूडमध्ये दिसून येतं, ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करतं. या दिवशी बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा उत्सव साजरा केला जातो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
24 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 24 सप्टेंबर रोजी जागतिक बॉलिवूड दिन असतो.